Thursday, November 13, 2008

वाटसरु

मागीतली तुझी साथ जेव्हा
नकारघंटा वाजवलीस तु,
विचारले जेव्हा 'त्याने' तुला
सहज त्याच्यात सामावलीस तु,
होतो मी त्याच्याच तोडीचा
नव्हतो ग एवढा फ़ालतु,
त्याला होकार देतांना नव्हता
का तुझ्या मनात काहीच किंतु?
तोडलेस माझे ह्रुद्य, जणु
होती ती एक टाकाऊ वस्तु,
आता मी कोणीच नाही तुझा
दिसणारही नाही तुला माझे अश्रु,
लक्षात ठेव एकच आता,
जेव्हा लागतील तुझे 'आपले' तुला विसरु,
प्रुथ्विच्या एका कोपर्यात झुरत आहे
तुझ्याच साठी हा वाट चुकलेला वाटसरु...

Wednesday, November 5, 2008

पहिली दिवाळी...बाळासोबतची

Dear Friends,

This was my first Diwali with my cute little baby gal. Sharing the experience of the same with you all. Hope you like it...

रांगोळ्यांची कलाक्रुती
अन दिव्यांची रोषणाई,
इवलुश्या डोळ्यांनी
मजेत न्याहरीत होती
ती सगळी ही नवलाई,
फ़टाक्यांची आतषबाजी
सोबतीला चिवडा, चकली,
दात नाही तरी, सारे
चाखण्याची हौसच भारी,
लक्षमी पुजनाच्या दिवशी
होती भलतीच खुश स्वारी,
गुलाबी त्या ड्रेस मध्ये
भासत होती गोंडस परी,
निरागस तिचे हास्य ते
आनंदात अजुनच भर घाली,
सुख समरुध्धीने परिपूर्ण होती
तिच्या समवेतली ही पहिली दिवाळी

Saturday, October 25, 2008

अबोल शब्द

शब्द आज माझ्यावर
खुपच रुसले आहेत
तुझ्या प्रमाणे तेही
अगदी अबोल झाले आहेत
कविता लिहायला
हातच थरथरतायेत
सुचलेल्या कल्पना
पानावर उतरवतांना
डोळे खुप पाणावतायेत
राग तुझा आता मावळेल
असे मनाला संकेत मिळतायेत
बघुन माझ्याकडे खुद्कन हसशील
असेच चिन्ह मला दिसतायेत
कळी तुझी खुलल्यावर
शब्दही लगेच जमणार आहेत
अन ह्याच शब्दांमुळे
कविता माझ्या उमलणार आहेत...

Wednesday, October 8, 2008

हास्य...एक वक्र रेषा

आयुष्य जगण्याच्या पण
काय एके-एकेकाच्या तर्हा
दुसर्याच्या आनंदात
मिळतो काहींना आनंद खरा
तर पैसा गोळा करण्यात
काहींचा जातो जन्म सारा
कोणि कसे जगावे ह्यावर
युक्तिवाद न केलेलाच बरा
तरीपण मित्रांनो विचार
करुन बघा ना जरा
मिळालाय मानवाचा जन्म
माणसा सारखे जगुन पहा
करुन भागाकार शत्रुंचा
"आपल्यांचा" गुणाकार करत रहा
असल्या चिंता मागे कितिही तरी
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
हास्य आहे अशी वक्र रेषा
जी सरळ करते आपली
अवघी जीवन रेषा...

(On 08/10/2008)

Wednesday, October 1, 2008

पाठवणी

सनई-चौघड्याचा मंगल सुर,
नव वधुच्या चेहरयावर
हास्य ते सुमधुर,
विवाह बंधनात अडकायला
दोन वेडे जीव आतुर,
उत्सुक्ता, भिती च्या संमिश्र
भावनांचे उठले मनी काहुर,
आली आता घटिका पाठवणीची
झाले तिचे हसु फ़ितुर,
मायेची ऊब दुरावण्याची
लागली तिला हुरहुर,
आई, बाबा, दादा, ताई
पासुन राहायचे कसे दुर,
डोळ्यात साठला गंगा
जमुना चा महापूर,
अवाक्षर उच्चारणे कठिण
झाला तिच स्वरही कातर,
सगळ्यांना सोडुन जाणे
नाही तिला मंजुर
पण आयुष्याचे नव्या
वळणाचे दिसते तिला द्वार,
मिळालेल्या प्रेमाच्या आठवणी
रुजवुन मनाच्या खोलवर,
नव्या नात्यां मध्ये विश्वास
स्थापण्याचा केला तिने निर्धार

Monday, September 29, 2008

राग तुझा

तुझ्या रागाच मला
काही कळतच नाही
अचानक कोसळणार्या
पावसासरखा कधी बरसेल
ह्याचा नेमच नाही
त्या दिवशी पण
अशीच चिडलीस
यायला उशीर झाला
म्हणुन केवढी वैतागलीस
घडाळ्याच्या काट्यां सोबत
पळण नेहमीच जमत नाही
एवढी छोटीशी गोष्ट
समजुन घे ना ग राणी
चिडल्यावर तर तुझ्या
रूपाला अजुनच लकाकी ये ई
पण तुझा अबोला सहन करण्याची
ताकदच माझ्यात नाही

Thursday, September 25, 2008

मानता ही नही...

तुझ्या नसण्याने मला तसा
काही फ़रक पडत नाही
पण तुला बघितल्या शिवाय
दिवस उगवल्याची खात्री
मात्र कधी पटतच नाही
तुझ्या एका 'झलक' वरच
मन माझे प्रसन्न राही
सदां-कदा तुझी गोड
छबि द्रुष्टीक्षेपात राही
नाही आपण बोललो कधी तरी
तुझा आवज़ कानात गुंजत राही
आहोत आपण फ़क्त
ओळखीचे अनोळखी
लाख वेळा बजावले तरी
ये पागल दिल मानता ही नही [:)]

Tuesday, September 23, 2008

न उमगलेले सत्य

तुझे हसणे, तुझे बोलणे
तुझ्याच भोवाती फिरे
माझे अवघे जीवनगाणे
मनी तु, ह्रुदयी तु,
स्वप्नीही तुझेच येणे जाणे
तु आणि मी आहोत वेगळे
कधीच न मी मानले
मग कय हे अघटित घडले?
तुझी स्वप्नसुंदरी भेटल्याचे
निर्धास्तपणे मलाच सांगितले
होते तुझ्या ओठांवर तेव्हा
गोड हसु जे पाहण्यासाठी होते
डोळे माझे कधीपासुन आसुसलेले
संगीतातले मधुर सप्त
सुरच अचानक अडखळले,
तुझ्या नकळत अश्रु टिपले
नव्हते मी कधीच तुझी हे
मात्र पहिल्यांदाच उमगले...

Tuesday, September 16, 2008

बाप्पांचे मनोगत

जवळ्च्याच दुकानात
मला पसंद केलस,
अर्धे पैसे देउन
मला "BOOK" केलस,
पैसे दिल्यावर पुन्हा
एकदा नीट पाहिलस,
उंदिर लहन आहे म्हणुन
परत "MODEL" बदलवस,
चतुर्थीला घेउन जाइन
हलकेच कानात सांगितलस,
घरी नेल्यावर मला
सुशोभित आसनावर बसवलस,
हार-तुरे,आरास,धुप दीप
सार सार काही केलस,
होती खरी भक्ती की
श्रद्धा असल्याचे
फ़क्त भासवलस?
दुसर्याच दिवशी मला
अलगद आसनावरुन हलवलस,
पुद्च्या वर्षी लव्कर या
असे मनोभवे विनवलस,
गुलाल उध्ळुन, जल्लोशात
विसर्जन माझ केलस,
दिड दिवस का होइना
भजन पुजन करुन
"विघ्नहर्ता" ची पदवी देऊन
पूर्ण जन्मा साठी अडकवलस

Monday, September 15, 2008

मनासारखे होतेच असे नाही...

तु आणि मी गुंफ़लोय
एक नजुक बंधनानी,
द्वेश,मत्सराची भावना
त्यात नावालाही नाही,
तु माझ अन मी तुझी
ह्या पलिकडे जगच नाही,
न जणो ह्या सुंदर नात्याला
कोणाची ती नजर लागली
माझ्या मागे कसली ही
विचित्र पिडा जडली?
राहिले आता थोडेच दिवस
हे आले तुझ्या ध्यानि,
कळले मलाही तेव्हाच
जेव्हा पाहिले पाणि
मी तुझ्या नयनी
सोबत घालवलेले ते
सुखद क्षण अनुभवत
होते मी काल संध्याकाळी
इंद्रधनु ने रंगवलेले
ते सप्तरंगी स्वप्ने आत
फ़क्त 'स्वप्ने'च राहणार होती
माफ़ कर रे सख्या मला
सोडुन चालले मी संगत तुझी
लाख आपण मनोरे रचले तरी
इमारत पूर्ण होतेच अस नाही
कारण प्रत्येक वेळी सारे काही
मनासारखे होतेच असे नाही...

Thursday, September 11, 2008

विचित्र मैत्री

राम आणि शाम म्हणजे
मैत्रीचे दुसरे नाम,
एकमेकां शिवय हालत
नाही त्यांचे पान
एके दिवशी केला त्यांनी
जंगलात जायचा 'Plan'
सोबत होते त्यांच्या
बर्गर अन कोक ची 'Can'
वीकेन्ड एन्जोय करायला
लोकेशन ते होत छान
फिरत होते इकडे-तिक्डे
प्राणि, पक्षी लहान-सहान
थोड्या अंतरावरच
दिसला त्यांना प्रचंड वाघ
बघताच त्यला, त्यांचे
हरपले पुरते भान
शामने हाताळली
परिस्थिति छान
म्हणाला आत जोरात
पळणे हे एकच काम
रामला तर सुटला
दरदरुन घाम
म्हणे वाघा पेक्षा
जोरत कस पळ्णार शाम?
शामने हसत हसत घातला
संवादाला लगाम.........

म्हणे मल तर पळायचय
फ़क्त तुझ्या पेक्ष वेगात
हे सगळ असच आहे मित्रांनो
"Corporate Culture " च्या जगात

Monday, September 8, 2008

"तो" आणि "ती"

तु "तो" आहेस म्हणुन
सर्व गुन्हे तुला माफ़ आहे
मी "ती" आहे म्हणुन
एवढुश्या चुकीचीही मला
मोठी सजा आहे
इकडुन मुलगा अन तिकडुन जावई
म्हणुन सतत तुझच
कौतुक आहे
पण मला आता एक प्रश्न आहे
की जर प्रत्येक व्यक्तीचे
असते एक व्यक्तिमत्व
मग फ़क्त पुरुषालाच
का देतात महत्व?
का झगडावे लागते
स्त्रीला सिद्ध करतांना
स्व:ताचे अस्तित्व?

Sunday, September 7, 2008

रिस्क

रोज तुला बघतो तरी
रोजच वेगळी भासतेस तु,
कालच्या पेक्षा आज
अधिकच सुन्दर दिसतेस तु

गालावरच्या गोड खळ्या अन
डोळ्यातल्या अवखळ छटा,
तारीफ़ तुझी करायला शब्द
तरी हवेत ना सुचायला

मनातले सांगायचा निश्चय
केला मी लाख वेळा
तु समोर आल्यावर वाणिने
माझ्या संप पुकारला

कळल्या तुला जर
माझ्या ह्या भावना,
न जणो उगाच
काय वाटेल तुला,


नाही जरी झाली
समजा माझी तु प्रिया,
तुझी मैत्रि गमवण्याची
"रिस्क" घ्याचीच नाही मला....

Wednesday, September 3, 2008

मुंग्यांची 'philosophy'

काल वाटेत भेटली
इवलुशी एक मुंगी
मला हँलो म्हणायची
नाही घेतली तिने तसदी

मीच तिला मग
अडवले जबरदस्ती,
म्हटले एव्हडी काय
ग तुला कामाची घाई?

उत्तर तिचे ऐकुन
मजा मला वाटली,
म्हणे काम केल्याशिवाय
कस निभायचे बाई?

रस्ता तिचा अडवल्यावर
वेगळी वाट तिने शोधली,
जातांना मात्र माझ्याकडे
बघुन खुदकन हसली

वाटते क्षुद्र तुम्हाला
मुंग्यांचे जीवन जरी,
त्याच्यातच सामावलीये
आयुष्याची 'Philosophy' सारी

रस्त्यात अपुल्या अडथळे
कित्येक दिसले तरी,
शोधत रहा मार्ग आणखी
नक्कीच होतील स्वप्ने खरी....

Tuesday, August 26, 2008

तुझ्याशिवाय

सवय झाली आहे आता
तुझ्याशिवाय जगण्याची,
डोळ्यातला पाण्याला
परत मागे लोटण्याची

भिती नाही वाटत अजिबात
काट्याँवर चालण्याची,
सँवेदनाच ठार मेलीये
सुख-दुःख अनुभवण्याची

कसरत छान जमलीये हसरा
मुखवटा धारण करण्याची,
कितिही असहय्य झाल तरी
स्मितरेषा ढळु न देण्य़ाची

आशाच पुरती मावळलीये
तु माघारी फिरण्याची,
आलास तरी पुन्हा एकदा
माझ्या मधे सामावण्याची...

Saturday, August 23, 2008

माझी छकुली

Dear Friends,
I am blessed with a cute baby gal recently. This poem is dedicated to her. Hope you like it.....

माझ्या छकुलीची
गोष्टच आहे न्यारी,
तिच्या रूपाने जणु
आली परी माझ्या घरी

निरागस डोळे ते
बघती भिरी भिरी
अवखळ हसु तिचे
वेड लावती भारी

लोभसवाण्या खुपच
सार्याच हाल चाली
तुझ्या मधे माझी
अवघी दुनिया सामावली

आतुरतेने वाट पाहते
कधी म्हणशील "आई"
बाळा तुझ्या ऋणातुन
होऊ कशी उतराई...

Friday, August 22, 2008

भाँडण ... भाँड्याँचे...

किचन मधल्या भाँड्याँची
झाली एकदा कट्टी,
कारण काय तर म्हणे कढईला
बघुन कुकरने मारली शिट्टी

सं'तापून' झाली कढई
अजुनच काळी
पण तरीही बिचारी
मुग गीळुन बसली

कढईच्या घोर अपमानाने
विळी फारच हळहळली,
गाळणीही झाली कसनुशी
टपोरे अश्रु ती 'गाळी'

चकचकीत चमच्याला
मात्र मिजासच भारी,
म्हणे कुकरला काळी
कढईच बरी आवडली

त्याँच्या पण जगाची
तिच रित झाली,
डावलुन अँर्तमनाला गोर्या
कातडीचीच जीत झाली...

Wednesday, August 20, 2008

यमाचे दुःख

काल आला होता साक्षात यम
माझ्या स्वप्नात, आश्चर्य वाटले
मला पाणी पाहुन त्याच्या डोळ्यात
करुन हिम्मत गेले त्याच्या पुढयात
रडण्याचे कारण पुसले एका झटक्यात

पाहुनि माझ्याकडे तो खिन्नपणे हसला
म्हणालाकामाचा ह्या मला आला क़ँटाळा
दुसर्याँना मारण्यात आनँद तो कसला
शिव्या-शापाँनी जीव माझा गाँजला
आर्त किँकाळ्या ऐकुन आत्मा माझा विटला

नको वाटते "जिवघेण" काम हे मला,
हे जग पाहुनी आज म्रुत्युदेवता ही बावरला,
सोबत माझ्या फिरुनी हा रेडा पण वैतागला
मन,भावना आहेत मला ही हे तुम्ही विसरला
माझ्या ह्या कामासाठी "रिलिवर" आता हवा....

Tuesday, August 19, 2008

तुझी साथ

अशक्य काहीच नाही
ह्या जगात, मग तुझी
सोबत का नाही ग
माझ्या नशिबात?

गोड क्षणाँचे द्रुश्य
सारखे माझ्या डोळ्यात
तुझ्याच आठवणी ग
नेहमीच माझ्या मनात

तुझ्या लाडिक गोष्टी
गुँजती माझ्या कानात
तुझ्या चेहर्याचे चाँदणे
कसे टाकु विस्मरणात?

घेऊन सात जन्माची शपथ
ह्या जन्मी ही नाही साथ
हे सगळे माझ्याच माथी
असा काय ग माझा अपराध???

Monday, August 18, 2008

आठवणी

भूतकाळाच्या प्रवासात
आला एक अनोखा टप्पा
मनाच्या कोपर्यातला
गोड आठवणीँचा कप्पा

इवलुश्या दातांनी तोडलेले
चिंच बोरांचे तुकडे
चिँचोक्याँ साठी सवँगड्याँ
सोबतचे भाँडण लटके

प्रार्थना , पसायदान अन्
जण, गण, मण चा नाद
त्या सुरेल स्मृति
आज ही घालती साद

अशा जादुई दुनियेत
मी कुठेतरी हरवून गेले
तिथुन बाहेर पडणे
मात्र खरच अवघड झाले...

Wednesday, August 13, 2008

जीवन... असे आणि तसे

जीवन कसे मस्त सुरु आहे
सन्थ वाहणारया सरिते सारखे
शांत पणे वाहत आहे
दुःख मुळी ठाऊकच नाही
फक्त् सुखाचेच सामराज्य आहे

ह्या सगळ्या बाहेर एक जग आहे
जिथे सुख नावाला हि नाहीये
तुमच्या आमच्या सारखे
दोन वेळचे जेवण ही
त्याँच्या नशिबी नाहीये

अन्न टाकुन देणार्याँच्या
ताटतले उष्ट ही आनँदाने
खाणारी ही जमात आहे
सुख - समरुद्धिचा चेहराच
ह्याँना अनोळखी आहे

पण माँल्सच्या लखलखाटात
ह्याँच्या अँधारलेल्या आयुष्या कडे
बघायला वेळ कोणाला आहे?
प्रत्येक जण आपलेच सुखी
आयुष्य जगण्यात "बिझी" आहे !!!!

Tuesday, August 12, 2008

आई

आत्मा आणि ईश्वर ह्यांचे
अनोखे मिश्रण म्हणजे "आई"
प्रेमाचे आणि ममतेचे
मुर्तिमन्त रूप म्हणजे "आई"

साधा नख लागता
बाळाला खळकन
डोळ्यात अश्रु येती
हीच व्यक्ति म्हणजे "आई"

परमेशवर स्वःच म्हणी
नाही शक्य माझे अस्तित्व
सर्वच ठिकणी
म्हणूनच मी प्रत्येक
मानवास दिली आहे "आई"....

Monday, August 11, 2008

प्रेम असे ही......

आयुष्याची मी झगडत होते
एक कटाक्ष तुझा मिळावा
म्हणुन आतल्या आत
मी झुरत होते

एक एक क्षण देवाला
मी उसणा मागत होते
एकदा तरी भेटशील म्हणुन
मराणाशी दोन हात करत होते

तू तिकडे शेकडो मैल दूर
भारत मातेच्या रक्षणार्थ,
मी वेडी इकडे तळ-मळत होते
मृत्यला हुलकावणी देत होते

डोळे भर भरुन शेवटच
तुला बघायचे होते
त्या सुखद क्षणाँ सोबत
परत एकदा जगायचे होते

तुझ्या वाटे कड़े
लक्ष माझे लागले होते
तुला भेटण्या साठीच
जणु यमाशी मी लढत होते

तुला न भेटण्याच दुःख
घेउनच मी मुक्त झाले होते
मरणा नँतर च्या प्रवासा
साठी मार्गस्थ झाले होते

वरती गेल्यावर मात्र
मला लगेच कळले
तुझ न येण हा
काही तुझा दोष नव्हता

तू तर तिथे आधीच
पोचला होता
नेहमी प्रमाणे हसत मुखाने
माझे स्वागत करत होता........

वेड्या सारख जगायचय

शहन्यां च्या ह्या जगात
मला वेड्या सारख जगायचय,
"काँरपोरेट कलचर" मधून
मुक्त होउन पहायचय

एक दिवस तरी मना सारखे जगायचय,
घङाळयाच्या काटयाँना खरच हो विसराचय,
मनाला वाटेल तेच करून पहायचय
सगळ्या बंधनाना झुगाङुन द्यायचय

पूर्ण जगाला विसरून
आपल्याच मस्तीत रहायचय,
लोक , नाती एक तरी दिवस विसरून
मला माझ्याच साठी जगायचय

संपूर्ण वर्षातला फक्त एक दिवस
मला माझ्या साठी द्यायचाय
अशक्य आहें ते मला
चांगले ठाऊक आहें

तरी सुद्धा ....

शहन्यां च्या ह्या जगात
मला वेड्या सारख जगायचय

Friday, August 8, 2008

हेच मुळी कळत नही.......

सुखाने भरलेले ताट समोर असतांना
डोळ्याचा कडा पाणावतात
मायेचे माणस सोबत असतांना
डोळे मात्र भरून येतात

असे का होते हेच मुळी कळत नही.......

मनाची हुरहुर मात्र तशीच राहते
तिन्ही सांजेला उगाच रित रित वाटते
उदास वातावरण अवती भवती राहते
दुखाआकंठ बुडाल्या सारखा वाटते

असे का होते हेच मुळी कळत नही.......

असे का होते ह्याचा मी शोध घेते
उत्तर शोधताना मीच प्रश्नात अडकते
केव्हा तरी हे सगले बंद होईल
असे मीच मला समजावते

तरी पण.....असे का होते हेच मुळी कळत नही.......

Sunday, June 15, 2008

माकडोबाचा विचार

माकडोबा च्या मनात
आला एक विचार,
म्हणाला आता पोरीचे
हात करावे चार,

मनात येताच विचार
त्याने दिल्या ऑफर चार,
वाट पाहत बसला
आता होकर की नकार?

दोन मुलां कडून
त्याला आला होकार,
माकडोबा च्या आनंदाला
नाही पारावार,

मुलां कद्च्याना बोलावून
त्याने केला पाहूनचार,
दोन लाख हुंडा मागताच
माकडोबा झाले गार.

अधीर नात्याच्या वाटेवर

तो एकटा, ती एकटी
आयुष्याच्या मार्गावर,
आतुर दोघांचे ही मन
चालाया अधीर नात्या च्या वाटेवर,

चंद्रा समान मोहक चेहरा अन्
गाला वरची गोड खली,
झाला तो पुरता कावरा बावरा
चालाया अधीर नात्या च्या वाटेवर,

अखेर तो मंगल दिन आला,
सनई चौघडा अन् सुमन माला,
मस्ताका वरी अक्षता पड़ता
तरंगु लागले अधीर नात्या च्या वाटेवर,

नव्या नवलाई चे ते दिवस सुमधुर,
जणू मोरपिस फिरे अंगभर,
एकमेका च्या सहवासत
चालले अधीर नात्या च्या वाटेवर,

नवलाई चा भर ओसरता,
रुसवे फुगवे अन् चिडा चिडी,
वाटले थोडा "धीर" धराया हवा होता
चालन्या आधी अधीर नात्या च्या वाटेवर.