Tuesday, August 26, 2008

तुझ्याशिवाय

सवय झाली आहे आता
तुझ्याशिवाय जगण्याची,
डोळ्यातला पाण्याला
परत मागे लोटण्याची

भिती नाही वाटत अजिबात
काट्याँवर चालण्याची,
सँवेदनाच ठार मेलीये
सुख-दुःख अनुभवण्याची

कसरत छान जमलीये हसरा
मुखवटा धारण करण्याची,
कितिही असहय्य झाल तरी
स्मितरेषा ढळु न देण्य़ाची

आशाच पुरती मावळलीये
तु माघारी फिरण्याची,
आलास तरी पुन्हा एकदा
माझ्या मधे सामावण्याची...

Saturday, August 23, 2008

माझी छकुली

Dear Friends,
I am blessed with a cute baby gal recently. This poem is dedicated to her. Hope you like it.....

माझ्या छकुलीची
गोष्टच आहे न्यारी,
तिच्या रूपाने जणु
आली परी माझ्या घरी

निरागस डोळे ते
बघती भिरी भिरी
अवखळ हसु तिचे
वेड लावती भारी

लोभसवाण्या खुपच
सार्याच हाल चाली
तुझ्या मधे माझी
अवघी दुनिया सामावली

आतुरतेने वाट पाहते
कधी म्हणशील "आई"
बाळा तुझ्या ऋणातुन
होऊ कशी उतराई...

Friday, August 22, 2008

भाँडण ... भाँड्याँचे...

किचन मधल्या भाँड्याँची
झाली एकदा कट्टी,
कारण काय तर म्हणे कढईला
बघुन कुकरने मारली शिट्टी

सं'तापून' झाली कढई
अजुनच काळी
पण तरीही बिचारी
मुग गीळुन बसली

कढईच्या घोर अपमानाने
विळी फारच हळहळली,
गाळणीही झाली कसनुशी
टपोरे अश्रु ती 'गाळी'

चकचकीत चमच्याला
मात्र मिजासच भारी,
म्हणे कुकरला काळी
कढईच बरी आवडली

त्याँच्या पण जगाची
तिच रित झाली,
डावलुन अँर्तमनाला गोर्या
कातडीचीच जीत झाली...

Wednesday, August 20, 2008

यमाचे दुःख

काल आला होता साक्षात यम
माझ्या स्वप्नात, आश्चर्य वाटले
मला पाणी पाहुन त्याच्या डोळ्यात
करुन हिम्मत गेले त्याच्या पुढयात
रडण्याचे कारण पुसले एका झटक्यात

पाहुनि माझ्याकडे तो खिन्नपणे हसला
म्हणालाकामाचा ह्या मला आला क़ँटाळा
दुसर्याँना मारण्यात आनँद तो कसला
शिव्या-शापाँनी जीव माझा गाँजला
आर्त किँकाळ्या ऐकुन आत्मा माझा विटला

नको वाटते "जिवघेण" काम हे मला,
हे जग पाहुनी आज म्रुत्युदेवता ही बावरला,
सोबत माझ्या फिरुनी हा रेडा पण वैतागला
मन,भावना आहेत मला ही हे तुम्ही विसरला
माझ्या ह्या कामासाठी "रिलिवर" आता हवा....

Tuesday, August 19, 2008

तुझी साथ

अशक्य काहीच नाही
ह्या जगात, मग तुझी
सोबत का नाही ग
माझ्या नशिबात?

गोड क्षणाँचे द्रुश्य
सारखे माझ्या डोळ्यात
तुझ्याच आठवणी ग
नेहमीच माझ्या मनात

तुझ्या लाडिक गोष्टी
गुँजती माझ्या कानात
तुझ्या चेहर्याचे चाँदणे
कसे टाकु विस्मरणात?

घेऊन सात जन्माची शपथ
ह्या जन्मी ही नाही साथ
हे सगळे माझ्याच माथी
असा काय ग माझा अपराध???

Monday, August 18, 2008

आठवणी

भूतकाळाच्या प्रवासात
आला एक अनोखा टप्पा
मनाच्या कोपर्यातला
गोड आठवणीँचा कप्पा

इवलुश्या दातांनी तोडलेले
चिंच बोरांचे तुकडे
चिँचोक्याँ साठी सवँगड्याँ
सोबतचे भाँडण लटके

प्रार्थना , पसायदान अन्
जण, गण, मण चा नाद
त्या सुरेल स्मृति
आज ही घालती साद

अशा जादुई दुनियेत
मी कुठेतरी हरवून गेले
तिथुन बाहेर पडणे
मात्र खरच अवघड झाले...

Wednesday, August 13, 2008

जीवन... असे आणि तसे

जीवन कसे मस्त सुरु आहे
सन्थ वाहणारया सरिते सारखे
शांत पणे वाहत आहे
दुःख मुळी ठाऊकच नाही
फक्त् सुखाचेच सामराज्य आहे

ह्या सगळ्या बाहेर एक जग आहे
जिथे सुख नावाला हि नाहीये
तुमच्या आमच्या सारखे
दोन वेळचे जेवण ही
त्याँच्या नशिबी नाहीये

अन्न टाकुन देणार्याँच्या
ताटतले उष्ट ही आनँदाने
खाणारी ही जमात आहे
सुख - समरुद्धिचा चेहराच
ह्याँना अनोळखी आहे

पण माँल्सच्या लखलखाटात
ह्याँच्या अँधारलेल्या आयुष्या कडे
बघायला वेळ कोणाला आहे?
प्रत्येक जण आपलेच सुखी
आयुष्य जगण्यात "बिझी" आहे !!!!

Tuesday, August 12, 2008

आई

आत्मा आणि ईश्वर ह्यांचे
अनोखे मिश्रण म्हणजे "आई"
प्रेमाचे आणि ममतेचे
मुर्तिमन्त रूप म्हणजे "आई"

साधा नख लागता
बाळाला खळकन
डोळ्यात अश्रु येती
हीच व्यक्ति म्हणजे "आई"

परमेशवर स्वःच म्हणी
नाही शक्य माझे अस्तित्व
सर्वच ठिकणी
म्हणूनच मी प्रत्येक
मानवास दिली आहे "आई"....

Monday, August 11, 2008

प्रेम असे ही......

आयुष्याची मी झगडत होते
एक कटाक्ष तुझा मिळावा
म्हणुन आतल्या आत
मी झुरत होते

एक एक क्षण देवाला
मी उसणा मागत होते
एकदा तरी भेटशील म्हणुन
मराणाशी दोन हात करत होते

तू तिकडे शेकडो मैल दूर
भारत मातेच्या रक्षणार्थ,
मी वेडी इकडे तळ-मळत होते
मृत्यला हुलकावणी देत होते

डोळे भर भरुन शेवटच
तुला बघायचे होते
त्या सुखद क्षणाँ सोबत
परत एकदा जगायचे होते

तुझ्या वाटे कड़े
लक्ष माझे लागले होते
तुला भेटण्या साठीच
जणु यमाशी मी लढत होते

तुला न भेटण्याच दुःख
घेउनच मी मुक्त झाले होते
मरणा नँतर च्या प्रवासा
साठी मार्गस्थ झाले होते

वरती गेल्यावर मात्र
मला लगेच कळले
तुझ न येण हा
काही तुझा दोष नव्हता

तू तर तिथे आधीच
पोचला होता
नेहमी प्रमाणे हसत मुखाने
माझे स्वागत करत होता........

वेड्या सारख जगायचय

शहन्यां च्या ह्या जगात
मला वेड्या सारख जगायचय,
"काँरपोरेट कलचर" मधून
मुक्त होउन पहायचय

एक दिवस तरी मना सारखे जगायचय,
घङाळयाच्या काटयाँना खरच हो विसराचय,
मनाला वाटेल तेच करून पहायचय
सगळ्या बंधनाना झुगाङुन द्यायचय

पूर्ण जगाला विसरून
आपल्याच मस्तीत रहायचय,
लोक , नाती एक तरी दिवस विसरून
मला माझ्याच साठी जगायचय

संपूर्ण वर्षातला फक्त एक दिवस
मला माझ्या साठी द्यायचाय
अशक्य आहें ते मला
चांगले ठाऊक आहें

तरी सुद्धा ....

शहन्यां च्या ह्या जगात
मला वेड्या सारख जगायचय

Friday, August 8, 2008

हेच मुळी कळत नही.......

सुखाने भरलेले ताट समोर असतांना
डोळ्याचा कडा पाणावतात
मायेचे माणस सोबत असतांना
डोळे मात्र भरून येतात

असे का होते हेच मुळी कळत नही.......

मनाची हुरहुर मात्र तशीच राहते
तिन्ही सांजेला उगाच रित रित वाटते
उदास वातावरण अवती भवती राहते
दुखाआकंठ बुडाल्या सारखा वाटते

असे का होते हेच मुळी कळत नही.......

असे का होते ह्याचा मी शोध घेते
उत्तर शोधताना मीच प्रश्नात अडकते
केव्हा तरी हे सगले बंद होईल
असे मीच मला समजावते

तरी पण.....असे का होते हेच मुळी कळत नही.......