Friday, August 22, 2008

भाँडण ... भाँड्याँचे...

किचन मधल्या भाँड्याँची
झाली एकदा कट्टी,
कारण काय तर म्हणे कढईला
बघुन कुकरने मारली शिट्टी

सं'तापून' झाली कढई
अजुनच काळी
पण तरीही बिचारी
मुग गीळुन बसली

कढईच्या घोर अपमानाने
विळी फारच हळहळली,
गाळणीही झाली कसनुशी
टपोरे अश्रु ती 'गाळी'

चकचकीत चमच्याला
मात्र मिजासच भारी,
म्हणे कुकरला काळी
कढईच बरी आवडली

त्याँच्या पण जगाची
तिच रित झाली,
डावलुन अँर्तमनाला गोर्या
कातडीचीच जीत झाली...

No comments: