Sunday, June 15, 2008

अधीर नात्याच्या वाटेवर

तो एकटा, ती एकटी
आयुष्याच्या मार्गावर,
आतुर दोघांचे ही मन
चालाया अधीर नात्या च्या वाटेवर,

चंद्रा समान मोहक चेहरा अन्
गाला वरची गोड खली,
झाला तो पुरता कावरा बावरा
चालाया अधीर नात्या च्या वाटेवर,

अखेर तो मंगल दिन आला,
सनई चौघडा अन् सुमन माला,
मस्ताका वरी अक्षता पड़ता
तरंगु लागले अधीर नात्या च्या वाटेवर,

नव्या नवलाई चे ते दिवस सुमधुर,
जणू मोरपिस फिरे अंगभर,
एकमेका च्या सहवासत
चालले अधीर नात्या च्या वाटेवर,

नवलाई चा भर ओसरता,
रुसवे फुगवे अन् चिडा चिडी,
वाटले थोडा "धीर" धराया हवा होता
चालन्या आधी अधीर नात्या च्या वाटेवर.

2 comments:

sheetal said...

Really Best Poem!!!!!!

Anonymous said...

तुमच्या कविता चांगल्या वाटल्या. तुम्ही त्या फेब्रुवारी २००९ मध्ये कॅलिफोर्निया येथे होणार्‍या साहित्य संमेलनात प्रवेशिका म्हणून पाठवाव्यात असे सुचवू ईच्छितो. ह्याविषयी अधिक माहिती तुम्हाला मिलिंद भांडारकर यांना व्य. नि. (ई-मेल) करून मिळवता येईल. त्यांचा ई-मेल पत्ता milind.bhandarkar@gmail.com.