Saturday, October 25, 2008

अबोल शब्द

शब्द आज माझ्यावर
खुपच रुसले आहेत
तुझ्या प्रमाणे तेही
अगदी अबोल झाले आहेत
कविता लिहायला
हातच थरथरतायेत
सुचलेल्या कल्पना
पानावर उतरवतांना
डोळे खुप पाणावतायेत
राग तुझा आता मावळेल
असे मनाला संकेत मिळतायेत
बघुन माझ्याकडे खुद्कन हसशील
असेच चिन्ह मला दिसतायेत
कळी तुझी खुलल्यावर
शब्दही लगेच जमणार आहेत
अन ह्याच शब्दांमुळे
कविता माझ्या उमलणार आहेत...

Wednesday, October 8, 2008

हास्य...एक वक्र रेषा

आयुष्य जगण्याच्या पण
काय एके-एकेकाच्या तर्हा
दुसर्याच्या आनंदात
मिळतो काहींना आनंद खरा
तर पैसा गोळा करण्यात
काहींचा जातो जन्म सारा
कोणि कसे जगावे ह्यावर
युक्तिवाद न केलेलाच बरा
तरीपण मित्रांनो विचार
करुन बघा ना जरा
मिळालाय मानवाचा जन्म
माणसा सारखे जगुन पहा
करुन भागाकार शत्रुंचा
"आपल्यांचा" गुणाकार करत रहा
असल्या चिंता मागे कितिही तरी
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
हास्य आहे अशी वक्र रेषा
जी सरळ करते आपली
अवघी जीवन रेषा...

(On 08/10/2008)

Wednesday, October 1, 2008

पाठवणी

सनई-चौघड्याचा मंगल सुर,
नव वधुच्या चेहरयावर
हास्य ते सुमधुर,
विवाह बंधनात अडकायला
दोन वेडे जीव आतुर,
उत्सुक्ता, भिती च्या संमिश्र
भावनांचे उठले मनी काहुर,
आली आता घटिका पाठवणीची
झाले तिचे हसु फ़ितुर,
मायेची ऊब दुरावण्याची
लागली तिला हुरहुर,
आई, बाबा, दादा, ताई
पासुन राहायचे कसे दुर,
डोळ्यात साठला गंगा
जमुना चा महापूर,
अवाक्षर उच्चारणे कठिण
झाला तिच स्वरही कातर,
सगळ्यांना सोडुन जाणे
नाही तिला मंजुर
पण आयुष्याचे नव्या
वळणाचे दिसते तिला द्वार,
मिळालेल्या प्रेमाच्या आठवणी
रुजवुन मनाच्या खोलवर,
नव्या नात्यां मध्ये विश्वास
स्थापण्याचा केला तिने निर्धार