Friday, May 8, 2015

माउचे पिल्लं


बाळाच्या कुशीत निजलय कोण?

इटुकली पिटुकली पिल्लं दोन,

मम्मा म्यावचा आला

बाळाला फोन,

देशील का ग माझ्या

पिल्लांना मेंदीचा कोन?

मेंदीने सजले पिल्लांचे

पंजे दोन,

पकडील ते आता कसा

ice - cream चा कोन?
म्याव म्याव !!!

खादाडेश्वर


खादाडेश्वर नावाचा एक

भला मोठा राक्षस ,

नेहमीच त्याचा खाण्यावर फोकस

रेसिपीस ही पाहिजे

चविष्ट आणि सरस,

प्यायला पाहिजे कोका कोला

नाहीतर ऊसाचा थंड गार रस,

खाण्या शिवाय वाटे

त्याला जीवनच निरस,

जेवल्यावर ही हव एक

भलं मोठ अननस,

खाण त्याच बघून

लोक म्हणती आता बस !!!

खादाडेश्वर मात्र मग्न

खाण्यात फ़्रुट सलाड

विथ almonds and

cashewnuts !!!

Sunday, November 25, 2012


वेडी आशा



वाटत होत मला

तु नक्कि परत येशील,

हरवलेल्या क्षणांना

पुन्हा एकदा जगवशील,

कोमेजलेल्या आठवणींना

हलुवार पणे फ़ुलवशील,

चिडलेल्या तुझ्या सखीला

नेहमी प्रमाणे समजावशील,

अजुनही आशा पल्लवित आहे

अलगदपणे तु माझे अश्रु टिपशील,

माझ्या एक हास्या साठी

पुर्ण जगाशी ही लढशील,

माहीत नव्हतं मला

तु असा ही वागशील,

साता जन्माच्या आणा-भाका घेऊन

अर्ध्यावर्तीच डाव मोडशील,

पटतच नाहीये मनला की

तु माझ्याही नकळत दूर होशील,

जीवनाच्या पुस्तकात आठवणीं च

फ़क्त पानच बनुन राहशील..........

Thursday, April 8, 2010

तो नेहमी मला विचरतो....

कसं जमतं तुला
शब्दां सोबत
एवढं खेळायला?
भावनांचे सुर
अलगद धाग्यात बांधायला?
काय उत्तर देऊ त्याच्या
ह्या वेड्या प्रश्नाला?
ठरवुन का जातं कोणी
शब्दांच्या गावा?
आपोआपच गुंफ़ल्या जातात
ह्या अक्षरांच्या माळा,
मनाचे अंतरंग, भावनांचे कल्लोळ
देतात रोज मला एक विषय नवा,
एकत्र केल सगळ्यांना की
जन्मते बघ एक सुन्दर कविता,
कितिही सांगितल तरी
पटतच नाही त्याला,
सारखा सारखा एकच प्रश्न...
कस जमत तुला......
कस जमत तुला......

Monday, August 10, 2009

ह्रुदय मन्दिर

तुझे माझे सोबत असणे
मानले होते ह्य जगाने,
ह्रुदय मंदिरी तुला पुजतांना
रोजच स्वप्न पहात होते नव्याने,

ध्यानी मनी ही नव्हते
नशिबाचे असे उलटे फ़िरणे,
दोघांच्या मनाविरुध्द
एक मेकांपासुन कायमचे दूरावणे,

विरहाने तुझ्या अश्रुंचे
परत परत येणे,
असह्य्य होतय आता सगळ्यांसाठी
खोटे खोटे आनंदी राहणे,

नाईलजने स्वीकारलय आत मी
पूर्ण आयुष्य तुझ्याशिवाय चालणे,
ह्रुदय मंदिरातील तुझी छबी मनातच जपुन
दूसर्यालाच कोणालातरी पुजणे....

Thursday, November 13, 2008

वाटसरु

मागीतली तुझी साथ जेव्हा
नकारघंटा वाजवलीस तु,
विचारले जेव्हा 'त्याने' तुला
सहज त्याच्यात सामावलीस तु,
होतो मी त्याच्याच तोडीचा
नव्हतो ग एवढा फ़ालतु,
त्याला होकार देतांना नव्हता
का तुझ्या मनात काहीच किंतु?
तोडलेस माझे ह्रुद्य, जणु
होती ती एक टाकाऊ वस्तु,
आता मी कोणीच नाही तुझा
दिसणारही नाही तुला माझे अश्रु,
लक्षात ठेव एकच आता,
जेव्हा लागतील तुझे 'आपले' तुला विसरु,
प्रुथ्विच्या एका कोपर्यात झुरत आहे
तुझ्याच साठी हा वाट चुकलेला वाटसरु...

Wednesday, November 5, 2008

पहिली दिवाळी...बाळासोबतची

Dear Friends,

This was my first Diwali with my cute little baby gal. Sharing the experience of the same with you all. Hope you like it...

रांगोळ्यांची कलाक्रुती
अन दिव्यांची रोषणाई,
इवलुश्या डोळ्यांनी
मजेत न्याहरीत होती
ती सगळी ही नवलाई,
फ़टाक्यांची आतषबाजी
सोबतीला चिवडा, चकली,
दात नाही तरी, सारे
चाखण्याची हौसच भारी,
लक्षमी पुजनाच्या दिवशी
होती भलतीच खुश स्वारी,
गुलाबी त्या ड्रेस मध्ये
भासत होती गोंडस परी,
निरागस तिचे हास्य ते
आनंदात अजुनच भर घाली,
सुख समरुध्धीने परिपूर्ण होती
तिच्या समवेतली ही पहिली दिवाळी